loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यातील कै.श्रीमती जानकीबाई तेंडुलकर महिलाश्रमातील महिलांसमवेत आम. किरण सामंत यांनी केली भाऊबीज साजरी

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : लांज्यातील कै. श्रीमती जानकीबाई तेंडुलकर महिलाश्रम येथे आमदार किरण सामंत यांच्यावतीने भाऊबीज कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. अनाथ महिलांसोबत भाऊबीज साजरी करताना अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले. या प्रसंगी आमदार सामंत यांनी महिलाश्रमातील सर्व बहिणींना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत मिठाई वाटप केले आणि त्यांच्या आरोग्य व सुखासाठी आशीर्वाद घेतले. महिलाश्रमातील सर्व महिलांनी आमदार सामंत यांना ओवाळणी केली. यावेळी एक भावनिक वातावरण निर्माण झाले. सामंत यांनी महिलाश्रमाच्या गरजा व सुविधा जाणून घेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, या महिला आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. समाजाने त्यांच्याबद्दल मायेने आणि जबाबदारीने विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाला महिलाश्रमाच्या अध्यक्षा डॉ.वर्षाताई कांबळे, ज्येष्ठ मार्गदर्शक जयवंतभाऊ शेटे, माजी नगराध्यक्ष संपदा वाघदरे, विद्याताई बेलवरकर, विजय बेर्डे, संदीप भिंगारडे, विजय खवळे, संजय तेंडुलकर, भाई कामत, गुरुप्रसाद देसाई, सचिन तेंडुलकर, मनोहर बाईत, प्रसादभाई शेट्ये, गणेशशेठ लाखन, मनोज तेंडुलकर, त्याचप्रमाणे सर्व बहिणी कार्यकर्त्या, स्थानिक नागरिक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg