loader
Breaking News
Breaking News
Foto

तामोंड अणसपुरे गावांना जोडणार्‍या खड्ड्यांच्या रस्त्याला डांबरीकरणाची प्रतिक्षा!

दापोली (प्रतिनिधी) - कच्च्या स्वरूपाचा रस्ता असला तरी तामोंड या दापोली तालूक्यातून खेड तालुक्यातील अणसपूरे गावाला जोडणार्‍या जोड रस्त्यामुळे खेड आणि दापोली तालुक्यातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होते. वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या अशा या रस्त्यावर ठिक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या या खड्डयांमध्ये पाणी तुंबून राहत असल्याने रस्त्यावरील वाहतूक धोक्याची झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करुन होणारी गैरसोय दूर करावी अशाप्रकारची मागणी होत आहे. दापोली तालुक्यातील तामोंड येथून खेड तालुक्यातील अनसपुरे या गावाकडून सवणस मार्गे खेडकडे जाण्यासाठीचा सर्वात जवळचा मार्ग आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मार्गावरील तामोंड आणि अणसपुरे या गावा दरम्यानचा ३ कि. मी. अंतर लांबीचा रस्ता हा २० वर्षापूर्वी खडीकरण झाला होता. या खडीकरण झालेल्या रस्त्याचे गेल्या २० वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाला साधे डांबरीकरण करता आलेले नाही ही सार्वजनिक बांधकाम विभागाची खरीच शोकांतिका आहे. यावरूनच सार्वजनिक बांधकाम विभागाची जनतेप्रती असलेली सेवावृत्ती दिसून येते. दापोली तालुक्यातील तामोंड, दमामे, कात्रण, भडवळे, पावनळ येथील विद्यार्थ्यांना दहावी नंतरच्या शिक्षणासाठी खेड तालुक्यातील अणसपुरे येथे शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी याच एकमेव रस्त्याने पायपीट करून अणसपूरे जावे लागते.

टाईम्स स्पेशल

तसे खेड तालुक्यातील अणसपुरे, सवणस आणि तळघर येथील रहिवाशांना याच रस्त्यावरून दापोली तालुक्यातील आपल्या सोय-या पावण्यांकडे काही कामानिमित्त ये जा करावी लागते. तर दापोली आणि खेड तालुक्यातील अनेक गावांना तामोंड अणसपूरे जोड रस्त्यामुळे वाहतुक करणे सुलभ होते. मात्र अणसपूरे तामोंड जोड रस्त्याची झालेली दुरवस्था ही येथील विकासाला खो घालणारी ठरत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची सुधारणा करून रस्ता वाहतूक योग्य करणे आवश्यक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg