loader
Breaking News
Breaking News
Foto

जालगाव बाजारपेठेत वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान

दापोली (वार्ताहर ) : दापोली शहराजवळ असलेल्या जालगाव बाजारपेठेत वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. प्रचंड गडगडाट होत असताना अचानक वीज पडली. या वीजेच्या फटक्यामुळे सहा ग्रामस्थांचे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले आहे. घटनास्थळी तलाठी बोरसे, पोलीस पाटील धीरज कदम आणि कोतवाल अनिकेत पाटे यांनी पंचनामा केला असून, झालेल्या नुकसानीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सुजय मेहता, अरविंद तलाठी आणि महेंद्र शेठ यांचे इन्व्हर्टर जळाले. चंद्रशेखर बुटाला यांचा टीव्ही आणि इन्व्हर्टर नष्ट, सूर्यकांत आपटे यांच्या चार पंख्यांचे नुकसान, संदीप तलाठी यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान, एका काजू फॅक्टरीतील ड्रायर जळाला, केतन आपटे यांच्या घरातील इन्व्हर्टर व पॅनल लाईट्स जळून खाली पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या नुकसानीने गावकऱ्यांचा उत्साह मावळला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg