loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावर्डे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - सावर्डे शुक्रवार दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावर्डे विभागीय कार्यालयाचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले. शिवसेना नेते व आमदार भास्करशेठ जाधव यांच्या शुभहस्ते कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यास शिवसेना उपनेते बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस, संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. आमदार भास्करशेठ जाधव यांनी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पुढील संघटनात्मक कार्यासाठी मार्गदर्शन केले. सावर्डेत नव्याने उभारलेल्या या कार्यालयातून पक्ष संघटन अधिक बळकट होऊन जनसेवेचे नवे अध्याय सुरू होतील असा विश्वास व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक राजूशेठ देवळेकर, उपतालुकाप्रमुख संदीप राणे, सचिन शेट्ये, राजाभाऊ नारकर, चिपळूण शहरप्रमुख भैया कदम, सावर्डे विभागप्रमुख सागर सावंत, मांडकी विभागप्रमुख रमेश कुंभार, असुर्डे विभागप्रमुख अजित गुजर, माजी जि.प. सदस्य संतोष चव्हाण, माजी प.स. सदस्य सुभाष जाधव, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, क्षेत्राध्यक्षा रुमाताई देवळेकर, शहर सचिव प्रशांत मुळ्ये तसेच ज्येष्ठ शिवसैनिक बाळशेठ पंडित, सुशिल सावंत, सुनिल जाधव, संजय कोकाटे, बावाशेठ राजेशिर्के, अकलाख शेख, राजू गुरव, बाबुदा गुडेकर, दत्ता उदेग, सुनिल गुरव, विष्णू चव्हाण, सुरेश वाघे, फैसल कास्कर, प्रसिद्धी प्रमुख सचिन चोरगे, यांच्यासह युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, तालुका संघटिका मानसी भोसले, युवासेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, युवतीसेना प्रमुख शिवानी कासार, उपविभाग प्रमुख रमेश राजेशिर्के, संदीप चव्हाण, फैय्याज शिरळकर, शाखाप्रमुख सुभाष राडे, विवेक सुर्वे, नयन कुळे, कृष्णा (नाना) हुमणे, तेजस घाणेकर, निलेश डिके, अमोल पिरधनकर, रुपेश घाग, मयूर घाग, शशी राणीम, निलेश भुवड, युवसेना विभाग प्रमुख भूपेश सावर्डेकर, नवनियुक्त विभाग प्रमुख धनराज वरेकर, युवासेना विभाग अधिकारी विशाल परकर, खामकर, बारकू बुआ, दिलीप घाग, बाबू भुवड, यांच्यासह अनेक मान्यवर व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी सावर्डे विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg