loader
Breaking News
Breaking News
Foto

आगामी निवडणुकीत विरोधकांचा 'सुफडासाफ' करा; अमित शाहांची मुंबईत गर्जना

मुंबई: मुंबईत भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडले. या कार्यालयाच्या भूमिपूजनामुळे कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह निर्माण झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा धुरळा उडण्याआधीच शाह यांनी स्पष्ट संदेश दिला आहे. “या निवडणुकीत विरोधकांचा सुफडासाफ करा... दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत!” अमित शाह असं म्हणताच संपूर्ण सभागृहात घोषणाबाजीचा गजर झाला.मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.हे मुख्यालय पक्षाच्या संघटनात्मक दृष्टीने राज्यात नवी ऊर्जा निर्माण करेल, असं अमित शाह यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील पुढच्या निवडणुका भाजपच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील आणि प्रत्येक स्थानिक संस्थेत भाजपाचा विजय सुनिश्चित करायचा आहे असा संदेश शाह यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविकास आघाडी वर जोरदार टीका केली करत अमित शाह म्हणाले ‘या तिघांच्या आघाडीचं एकमेव उद्दिष्ट सत्ता टिकवणं होतं, विकास नव्हे. मोदी सरकारने देशाला गती दिली, पण महाराष्ट्रात आघाडीने स्थगिती आणली.’

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg