loader
Breaking News
Breaking News
Foto

अमली पदार्थ व बेदरकार वाहनचालन विरोधात निर्णायक पावले, शिवसेना (उबाठा) महिला आघाडीची पोलीस विभागाशी चर्चा

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - चिपळूणमध्ये तरुणांमध्ये झपाट्याने वाढणार्‍या अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात तातडीने कारवाईची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीने आज पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले यांच्याकडे केली. शाळा व महाविद्यालय परिसरात काही युवकांकडून धूम स्टाईलने होत असलेल्या बेदरकार वाहनचालनाचा मुद्दाही यावेळी तीव्रतेने मांडण्यात आला. पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले यांनी पोलीस विभागाकडून अंमली पदार्थ व वाहतूक नियमभंगाविरोधात अ‍ॅक्शन रोड मॅप तयार करण्यात आल्याची माहिती दिली. समाजाच्या सहकार्यानेच ही लढाई लढता येईल, असे सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भेटीत शिवसेना चिपळूण विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, महिला विधानसभा क्षेत्र संघटिका रूमा देवळेकर, तसेच महिला शहर संघटिका वैशाली शिंदे यांनी तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी कडक पावले उचलावीत अशी मागणी केली. चिपळूणच्या सुरक्षित आणि स्वच्छ भविष्याकरिता पोलीस व समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांची ही सुरुवात ठरणार आहे, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव (बाळा) कदम, चिपळूण संगमेश्वर विधानसभा महिला क्षेत्र संघटिका रुमा देवळेकर, तालुका प्रमुख बळीराम गुजर, तालुका संघटिका मानसी भोसले, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, उपतालुका संघटिका दीप्ती सावंत देसाई, उपशहरप्रमुख संतोष पवार, शहर संघटिका वैशाली शिंदे, विभागप्रमुख अजित गुजर, मनोज पांचाळ, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे, युवती अधिकारी तीर्था लाड, शाखाप्रमुख माधवी दिवटे, शाखा संघटिका निखी साळुंखे, उपशाखा संघटिका सुहासिनी मुकादम, वैशाली मानकर, अनिता पिसे, विद्या महाडिक व सुनिल सावंत-देसाई उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg