loader
Breaking News
Breaking News
Foto

अटक करण्यात आलेल्या त्या दोन्ही महिला संचालकांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

खेड - शहराजवळील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधीच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भरणे येथील तेजा राजाराम बैकर व रेवती चंद्रकांत खातू या दोन्ही महिला संचालकांना शनिवार दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी येथील न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंतवणूकदारांच्या वतीने रत्नागिरी येथील प्रथितयश सरकारी वकील मेघना नलावडे यांनी काम पाहिले. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या अध्यक्ष दत्ताराम बैकर, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, माजी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया सुतार व सदस्य सुभाष शिंदे या पाच संचालकांपैकी माजी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला असून सुधाकर शिंदे व सुभाष शिंदे यांचे जामीन अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे सद्यस्थितीत गुन्हे दाखल झालेल्या १६ जणांपैकी अध्यक्ष दत्ताराम बैकर, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया सुतार व सदस्य सुभाष शिंदे या चौघांसह शनिवारी कोठडी सुनावलेल्या तेजा बैकर व रेवती खातू असे एकूण ६ संचालक कोठडीत आहेत. अन्य संचालक व कर्मचारी यांच्यावर सुध्दा अटकेची टांगती तलवार आहे. शहराजवळील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. येथे तब्बल ४ कोटी २२ लाख ८१ हजार २१ रुपयांचा अपहार झाल्याचे वैधानिक लेखापरीक्षणात उघड झाले आहे. गुंतवणूकदारांच्या वतीने येथील प्रतिथयश वकील अश्विन भोसले व सरकारी वकील जाडकर यांनी काम पाहिले. सहकार विभागाच्या विशेष लेखापरीक्षक विनोद वामनराव अंड्रस्कर यांनी दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी येथील पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार सन २०२३—२४ आणि २०२४—२०२५ या कालावधीत संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण केले.

टाईम्स स्पेशल

त्यात कर्जवाटपात नियमांचे उल्लंघन, खोट्या सही, तारणाशिवाय कर्ज, बनावट मुदत ठेव पावत्या तयार करणे, रोख रकमेची बेकायदेशीर उचल, इतर कर्ज खात्यांना रक्कम वळती अशा गंभीर गैरव्यवहारांचा पर्दाफाश झाला. अपहाराची तपशीलवार रक्कम: मुदत ठेव तारण कर्ज - ३,२३,५५,१४९, अल्प बचत ठेव तारण कर्ज - ३९,१९,२६०, स्थावर तारण कर्ज ५ लाख आवर्त ठेव तारण कर्ज - ११,५०,०००, व्यवसाय कर्ज - ३६,२००, बनावट मुदत ठेवी पावत्या - ४३,२०,४१२ असा एकूण अपहार ४ कोटी २२ लाख ८१ हजार २१ रुपये अपहार झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg