loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये दिपोत्सव-२०२५ विविध स्पर्धांच्या मानकर्‍यांचा गौरव

खेड (दिलीप देवळेकर) - भारतीय जनता पार्टी, खेड व वैभव खेडेकर मित्र मंडळ आयोजित दीपोत्सवात किल्ले स्पर्धा, कंदील स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. किल्ला स्पर्धेमध्ये संत रोहिदास नगर मित्रमंडळ, शिवतर रोड किल्ला राजगड यांनी प्रथम पारितोषिक विजेत्याचा मान पटकावला. सोबत द्वितीय पारितोषिक विजेते जिवलग मैत्री ग्रुप किल्ला प्रतापगड, तृतीय पारितोषिक विजेता. कु. अयान विनायक गुडेकर, किल्ला रायगड यांनी पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कंदील स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेता दिलीप प्रभाकर कारेकर ठरले. द्वितीय पारितोषिक विजेता सचिन जाधव ठरले आणि तृतीय पारितोषिक विजेता मिलिंद सावळाराम बेंडखळे ठरले. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेता होण्याचा मान सौ. मुग्धा सिद्धेश पाटणे यांनी पटकावला. बक्षिस वितरण समारंभास वैभव खेडेकर, संजय आखाडे, मिलिंद नांदगावकर, शैलेश मेहता, वैजेश सागवेकर, प्रशांत बारटक्के, जयेश गुहागरकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg