loader
Breaking News
Breaking News
Foto

नांदगावची सुकन्या सेरेना म्हसकरने कबड्डी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला दिले सुवर्णपदक

कणकवली (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यातील नांदगाव मधलीवाडी येथील सुकन्या सेरेना सचिन म्हसकर हिने नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या एशियन युथ गेम्स कबड्डी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिचे विमानतळावर आगमन होताच भारतामध्ये जंगी स्वागत करण्यात आले. भारत माता की जय ... वंदे मातरम् अशा घोषणाही देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कणकवली तालुक्यातील नांदगाव मधलीवाडी येथील सेरेना सचिन मेघाली म्हसकर सध्या भांडुप मुंबई येथे वडिलांच्या नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे . सध्या दहावी इयत्तेमध्ये शिकत असतानाच वडील सचिन म्हसकर स्वतः कबड्डीपटू तसेच आई मेघाली ही सुद्धा कबड्डीपटू या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगी सेरेना ही लहानपणापासूनच कबड्डीचे धडे गिरवायला लागली.

टाईम्स स्पेशल

सेरेनाची आई शिवछत्रपती पुरस्कार विजेती ठरली आहे. फर्स्ट एशियन गोल्ड मेडलिस्ट कबड्डी सेरेनाची आई भारताची उपकर्णधार ही आहे. कबड्डीमध्ये महाराष्ट्र संघामधून ४ वेळा प्रतिनिधित्व केले होते. मुंबई उपनगरवरून ३ वेळा प्रतिनिधित्व केले होते आणि आता नुकतीच आंतरराष्ट्रीय झालेल्या कबड्डी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याने सेरेनाचा भारतभर जयजयकार होत आहे. कणकवली तालुक्यातील नांदगाव मधली वाडी हे त्याचं गाव असल्याने या गावांमधूनही अभिनंदनचा वर्षाव तिच्यावर होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg