loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाची ‘दिवाळी’ संपेना , आज कुठे-कुठे कोसळणार ? 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान..

सध्या दिवसभ ऑक्टोबर हीट जाणवत असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता याच उकाड्यादरम्यान पुण्यासह राज्यातील अनेक अनेक भागातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो. तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण भारतात 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचा परिणाम परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवसभर उकाडा वाढणार असला तरीही दुपारनंतर महाराष्ट्रातील तळ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही पट्ट्यांमध्ये पाऊस पडू शकतो. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान पुण्यात पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑक्टोबर हिटमुळे वाढलेल्या उघड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शहर आणि परिसरात गुरुवार आणि शुक्रवार पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तापमानात मोठी घट झाली. तर आता पुढचे दोन दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.तसेच मुंबईतही पुढचे दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत गडगडाटसह वादळी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg