loader
Breaking News
Breaking News
Foto

जनता विद्यालय आंगवलीच्या रणजित पवार यांना राज्यस्तरीय सत्यशोध गुणवंत कर्मचारी पुरस्कार

आबलोली (संदेश कदम) - संगमेश्वर तालुक्यातील जनता विद्यालय, आंगवली या विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी रणजित रविंद्र पवार यांना नुकताच कामगार नेता नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत कर्मचारी पुरस्कार – २०२५ हा प्रतिष्ठित सन्मान पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) तर्फे आयोजित सातवे महाराष्ट्र राज्य अधिवेशन २०२५ या भव्यदिव्य कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंजपेठ, पुणे येथे प्रदान करण्यात आला. रणजित पवार यांनी शिक्षकेतर सेवेत प्रामाणिकपणे, शिस्तबद्धतेने व जबाबदारीने कार्य करून संस्थेचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या कार्यतत्परतेची, सामाजिक जाणिवेची आणि निष्ठेची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले. या यशाबद्दल रणजित पवार म्हणाले की, “हा पुरस्कार माझ्या आई, गुरूजनांना, सहकाऱ्यांना व संस्थेला समर्पित आहे. हे यश मला समाजासाठी अधिक कार्य करण्याची प्रेरणा देते.” या सन्मानामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा आणि संगमेश्वर तालुक्याचा अभिमान अधिक वाढला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg