loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत २६-२७ ऑक्टोबर रोजी ‘विंटर सायक्लोथॉन २०२५’ स्पर्धा रंगणार

संगलट (खेड) (प्रतिनिधी) - सायकल चालवण्याची आवड वाढवून “फिटनेस आणि पर्यावरणपूरक प्रवास” याचा संदेश देण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे ‘दापोली विंटर सायक्लोथॉन २०२५ – सिझन ८’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी सकाळी सोहनी विद्यामंदिर मैदान, दापोली येथे पार पडणार असून या दोन दिवसांत दापोली सायकलप्रेमींच्या जल्लोषाने दुमदुमणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशभरातील नामांकित सायकलस्वार सहभागी होणार आहेत. नुकतेच दिल्ली–कोलकाता–पुणे ३४४४ किमी अंतराची राईड पूर्ण केलेले ७९ वर्षीय गौतम भिंगानिया, तसेच युरोपातील ८ देश पार करणाऱ्या ‘नॉर्थ केप ४०००’ (४००० किमी) स्पर्धेत सहभागी झालेले विश्वनाथन सर, विद्याधर पालकर, फिरोज खान यांसारखे अनुभवी रायडर्स या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहेत. या दिग्गज रायडर्सच्या अनुभवकथनातून प्रेरणा घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे, हे दापोलीकरांसाठी खास संधी ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेची वैशिष्ट्ये : अंतर: १ ते २०० किमी. श्रेणी: फन राईड, शॉर्ट सिटी लूप (४–२०० किमी) आणि ५० किमी किंगफिशर सिनिक रूट. प्रत्येक सहभागीला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र. विशेष बक्षिसे: ७५ किमी – ₹३०० १०० किमी – ₹४०० १२५ किमी – ₹५०० १५० किमी – ₹६०० १७५ किमी – ₹७०० २०० किमी – ₹८०० ५० किमी ‘किंगफिशर सिनिक रूट’. सोहनी विद्यामंदिर, दापोली ते जालगाव, उंबर्ले, ओळगाव, किन्हळ, देवके, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, आसूद, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य मार्ग असेल. या मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, मेडिकल मदत आणि बॅकअप टेम्पो अशी सर्व सोय आयोजकांनी केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg