loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत पावसाचे धुमशान, भातशेतीचे प्रचंड नुकसान

रत्नागिरी - शहर आणि तालुक्यात सोमवार सायंकाळी ४ वाजल्यानंतर पावसाचे धुमशान सुरु आहे. जून महिन्यात येणारा पाऊस जसा हैदोस घालतो तसा पावसाने सलग दोन तास हैदोस घातला. पावसाचे धुमशान शेतीसाठी मारक ठरणार आहे. कापणीला आलेली शेती प्रचंड प्रमाणात नाश पावणार आहे. त्यामुळे शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. यंदा पाऊस समाधानकारक होता पण परतीच्या पावसाने भातशेतीची दैना उडवून दिली आहे. शेतकरी बांधावर बसून रडतो आहे आणि सरकारचे मात्र याकडे लक्ष नाही. आज झालेल्या मुसळधार पावसाने पिकलेली भातशेती आडवी झाली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तातडीने मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय पातळीवरुन शेतीचे पंचनामे करुन सामान्य शेतकर्‍याला मदत पोहचविली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg