loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरेखोल नदीतून हत्ती माघारी परतला!

बांदा : (प्रतिनिधी) - दोन दिवसांपूर्वी कास गावातून तेरेखोल नदी पार करून गोव्यातील तोरसे भागाकडे जाणारा ओमकार हत्ती अखेर माघारी परतला. तोरसेच्या नदीकिनारी अचानक झालेल्या फटाक्यांच्या आवाजाने घाबरून हा हत्ती पुन्हा कास गावाच्या दिशेने वळला तो थेट मडुरा बाबरवाडी मार्गे रोणापाल गावात पोहोचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता रोणापाल गावातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या २० ते २५ दिवसांपासून ओमकारचा कास, मडुरा आणि सातोसे भागात वावर सुरू आहे. या काळात त्याने अनेक शेतकऱ्यांची भातशेती तुडवून मोठे नुकसान केले आहे. मात्र ग्रामस्थांच्या मते, ओमकार आपले कळपापासून चुकला असून, तो पुन्हा कुटुंब शोधत आहे. त्यामुळेच तो आलेल्या मार्गाने जंगलाच्या दिशेने परतण्याचा प्रयत्न करत आहे, असे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यात चार हत्ती असून ओमकार हा त्यांच्या सोबत असायचा. तो ज्या मार्गाने कास गावातील मनुष्यवस्तीत आला, त्याच मार्गाने पुन्हा परतण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु तोरसेच्या बाजूने झालेल्या फटाक्यांच्या आवाजामुळे त्याने नदी पार करण्याचे टाळले. त्यामुळे ओमकार पुन्हा महाराष्ट्राच्या सीमेकडे वळून मडुरा मार्गे रोणापाल गावात गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वनविभागाने आता या घटनेकडे गांभीर्याने पाहून तज्ञांच्या मदतीने ओमकारला सुरक्षितपणे जंगलात परत पाठवावे, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान थांबेल.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg