loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळे पंचायत समिती गणातील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

देवळे (प्रकाश चाळके) - आमदार किरण तथा भैय्या सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कनकाडी बौद्धवाडी, सुतारवाडी, गराटे वाडी आणि दाभोळे बुद्धविहार येथील असंख्य ग्रामस्थांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आमदार सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी आज सकाळी पार पडला. कनकाडी गावचे माजी उपसरपंच संदेश जाधव, दिपाली जाधव, बौद्धवाडीमधून माजी तंटामुक्ती अध्यक्ष अनिल जाधव, तुकाराम जाधव, श्रीपत सावंत, अमित जाधव, भीमराज जाधव, अनिकेत कांबळे, काशिनाथ सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ कांबळे, रवींद्र जाधव व विनय जाधव, सरिता सावंत, संघमित्रा सावंत आदींनी पक्षात प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मेघी गावातून माजी ग्रामपंचायत सदस्य नरेश वाजे, विद्यमान सदस्य रमेश बेटकर, तर दाभोळे बौद्धवाडीतील प्रदीप कांबळे, दीपेश कांबळे, रवींद्र कांबळे, वैभव कांबळे, अजय कांबळे, सिद्धार्थ कांबळे, सुनील कांबळे, यशवंत कांबळे, विनोद कांबळे, संजय जाधव, गाव मंडळ अध्यक्ष भिकाजी कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप कांबळे, पंकज कांबळे, विजय शिवराम कांबळे, यशवंत कांबळे, मधुर कांबळे, सिद्धार्थ जाधव व संजय जाधव यांनी देखील शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला.कनकाडी गराटेवाडी, सुतारवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष बंडागळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शशिकांत खांदारे, तसेच मधुकर पांचाळ, दत्ताराम पांचाळ, दिलीप पांचाळ, आत्माराम पांचाळ, सुरेश पांचाळ, सुभाष पांचाळ, दिनेश पांचाळ, योगेश पांचाळ, गंगाराम पांचाळ, विजय पानाचा, प्रकाश पांचाळ, दीपक पांचाळ, अनंत गराटे, सुरेश मराठे आणि बाबू मराठे, सचिन खांदारे, दीपक गराटे व मंगेश गराटे, यश खांदारे, प्रणय आमटे यांचाही या प्रवेश सोहळ्यात सहभाग होता.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाप्रसंगी उपविभाग प्रमुख हेमंत शिंदे, काशीनाथ सकपाळ, विभाग संघटक शुभम गांधी, कनकाडी शाखा प्रमुख विलास सुकम, मेघी शाखा प्रमुख प्रमिल चव्हाण, युवासेना शाखा प्रमुख अजिंक्य दाभोळकर, उपसरपंच किरण दाभोळकर यांची उपस्थिती होती. आमदार किरण (भैय्या)सामंत यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासकामांवर ग्रामस्थांचा विश्वास वाढत असून, या मोठ्या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी बळकट होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg