loader
Breaking News
Breaking News
Foto

अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार: काँग्रेसचा इशारा

खेड (प्रतिनिधी):-तालुक्यातील भरणे ते दापोली राज्य मार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास शेळके यांनी नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत, ’नगरपरिषद हद्दीतील रस्ता क्षेत्र मोकळा करून कामाला परवानगी द्यावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल’, असा तीव्र इशारा दिला आहे. डॉ. शेळके यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, ’भरणे ते दापोली या राज्य मार्गाचे काम मंजूर होऊनही नगरपरिषदेकडून जागा मोकळी करून न दिल्याने प्रकल्प अडथळ्यात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात आली नाहीत, तर काँग्रेसला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. नगरपरिषद आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे विकासकामे ठप्प आहेत. जनतेचा संयम सुटला असून, पुढील महिनाभरात काम सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल.’ या विषयाची प्रत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली असून, खेड काँग्रेसने प्रशासनाला जागे होण्याचा अंतिम इशारा दिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg