loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी येथील प. पू. राऊळ महाराज स्मारक मंदिराच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - कुडाळ पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराज यांची किर्ती सर्वञ परिचित आहे. थोर संत या पिंगुळी गावाला लाभले. या राऊळ महाराज यांचे स्मारक मंदिर राऊळ महाराज यांच्या इच्छेप्रमाणे स्वर्गीय प. पू. विनायक उर्फ अण्णा महाराज यांनी साटेली भेडशी येथे आठ वर्षापूर्वी मंदिराची उभारणी करत स्मारक उभारले या स्मारक मंदिराचा नववा वर्धापनदिन सोमवार दिनांक ३/११/२०२५ रोजी साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून दर्शन तसेच इतर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राऊळ महाराज संस्थान पिंगुळी कार्याध्यक्ष विठोबा राऊळ यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री. प.पू.स. समर्थ राऊळ महाराज स्मारक मंदिर साटेली भेडशीचा ९ वा वर्धापन दिन सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या निमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक इतर कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित केले आहेत. सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ पहाटे ०५.३० वा ते ६ वा. सकाळी ७ ते ९ वा. काकड आरती, श्री. प. पू. स. स. राऊळ महाराज चरणी अभिषेक, पाद्यपूजा सार्वजनिक गार्‍हाणे, सकाळी ९ ते १० वा. भवानी सातेरी धारेश्वर महिला भजन मंडळ-घोडगे यांचे सुश्राव्य भजन सातेरी महिला भजन मंडळ खनयाळे यांचे सुश्राव्य भजन, सकाळी १० ते ११ वा. सकाळी ११ ते १२ वा. सातेरी केळबाई महिला भजन मंडळ दोडामार्ग यांचे सुश्राव्य भजन, दुपारी १२.३० ते १ वा. श्रीची महाआरती, दुपारी १ ते ३ वा. रात्रौ ८ ते १० वा. पर्यत दुपारी १ २.३० वा. दुपारी २.३० ते ४ वा. श्री हनुमान दामोदर प्रासादिक भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन घारपी ग्रुप यांची लहान मुलांची फुगडी सायं. ४ ते ६ वा. भाऊ नाईक यांचे किर्तन सायं. ६ ते ७ वा. समई नृत्य - श्री सातेरी लोककला मंच महिला ग्रुप तळेखोल सायं. ७ ते ८ वा. सांजआरती रात्रौ ८ ते १० वा. राऊळ महाराज यांची पालखी मिरवणूक दिंडी सोहळा, ढोल ताशांच्या गजरात राञी दहा वाजता माजी विद्यार्थी संघ - कुडासे यांचा ऐतिहासिक नाट्यप्रयोग गरुडझेप (आग्र्याहून सुटका) सौजन्य - राजन दत्ताराम म्हापसेकर, अशोक विश्वनाथ कदम, तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून दर्शन, महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष विठोबा विनायक राऊळ यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg