loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाने रडवले, हत्तीने तुडविले!

बांदा : (प्रतिनिधी) - मडुरा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. एका बाजूने अवकाळी पावसाने भातकापणी खोळंबवून शेतकऱ्यांना हतबल केले, तर दुसऱ्या बाजूने कास, सातोसे आणि मडुरा परिसरातील भातशेती ओमकार हत्तीने अक्षरशः पायदळी तुडवून टाकली आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर मनात संताप उसळला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मडुरा पंचक्रोशीतील पाडलोस, रोणापाल, निगुडे, कास, सातोसे, मडुरा आणि शेर्ले या भागांमध्ये भातकापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतात उभे असलेले आणि कापलेले दोन्ही पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणी न केल्यास भातपीक शेतात गळते आणि कापणी केली तरी पावसात भिजून जाते, असे सांगत शेतकरी हतबल झाले आहेत.

टाइम्स स्पेशल

त्यातच ओमकार हत्तीच्या सततच्या वावरामुळे कास, मडुरा व कास गावातील शेतकरी शेतात जाण्याचे टाळत आहेत. या हत्तीने गेल्या बहुतांश शेतातील उभे पीक तुडवून टाकले आहे. वनविभागाचे अधिकारी पंचनामा करत असले तरी भरपाईचा मागमूस नाही, अशी खंत सातोसे माजी सरपंच आबा धुरी यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg