loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल : सूर्यकांत दळवी

खेड (प्रतिनिधी):- खेड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पाटी उत्तर रत्नागिरी-दापोली विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक खेड येथील द. ग. तटकरे सभागृहात संपन्न झाली. या बैठकीस माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे, केदार साठे, वैभव खेडेकर, ऋषिकेश मोरे, विनोद चाळके, अनिकेत कानडे, संजय बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी दळवी बोलत होते. बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्याचे भाग्य मला मिळवून द्या. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करावेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी आमदार सूर्यकांत दळवी म्हणाले की, खेडच्या मदतीला दापोली आणि मंडणगड येणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवायचे आहे. पक्षाकडून सध्या केवळ मुंबई आणि ठाण्यात युतीचे धोरण जाहीर झाले आहे. कोणीही सोबत आले नाही तरी आपण विजयासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. ही निवडणूक आपण जिंकायचीच आहे. ते पुढे म्हणाले, शिवसेना शिंदे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यांनी ताकद दाखवायची ठरवली तर आपणही आपली ताकद दाखवून द्यायची आहे. मंडणगड तालुक्यातील सोवेली पंचक्रोशीत प्रस्तावित औद्योगिक वसाहत गेली ३५ वर्षे रखडली आहे. ती पूर्ण होत नसेल तर रद्द करून जमिनी लोकांना परत द्याव्यात. लोकांना बदल हवा आहे आणि २०२९ च्या निवडणुकांची नांदी म्हणून या निवडणुका जिंकणे आवश्यक आहे. खेड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वात नक्कीच फडकेल. सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत घेणे गरजेचे आहे.

टाईम्स स्पेशल

या वेळी काही अन्य पक्षांतील कार्यकत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. संपूर्ण बैठकीत निवडणुका विजयाच्या निर्धाराचा आणि कार्यकत्यामध्ये नव्या उर्जेचा उत्साह जाण्यात होता. शहरातील द. ग. तटकरे सभागृहात झालेल्या भाजपच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर व माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा करत कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष अनिकेत कानडे, भूषण काणे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg