loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवतर-कोडबा धरण जलपूजन सोहळा संपन्न; जलसंपन्नतेच्या नव्या पर्वाची सुरुवात – राज्यमंत्री योगेश कदम

खेड (प्रतिनिधी)- खेड तालुक्यातील शिवतर, कोडबा, जामगे आणि परिसरातील गावांना शाश्वत पाणीपुरवठा मिळावा या उद्देशाने उभारण्यात आलेल्या शिवतर-कोडबा धरणाचे जलपूजन आज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रकल्पातून प्रत्यक्ष पाणी वाटपाला सुरुवात झाली असून या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलसमृद्धीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. राज्यमंत्री कदम म्हणाले, “चार वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या धरणाचे भूमिपूजन झाले होते. आज त्याच कार्याची पूर्तता प्रत्यक्षात होताना पाहून समाधान शब्दात व्यक्त करता येणार नाही. या प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून पाण्याच्या टंचाईशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवतर-कोडबा धरण हे २९० मीटर लांब आणि ४० मीटर उंच असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे २४० हेक्टर क्षेत्रावर सिंचन शक्य होणार आहे. एकूण ३५ हेक्टर भूमी या प्रकल्पासाठी वापरली गेली असून, शासनाची प्रशासकीय मान्यता ₹ ६०.७५ कोटी इतकी आहे. राज्यमंत्री कदम म्हणाले, “शिवतर-कोडबा धरण हा फक्त जलस्रोत निर्माण करणारा नाही, तर ग्रामीण जीवनमान उंचावणारा आणि शेतीला नवजीवन देणारा प्रकल्प आहे. या माध्यमातून जलसंधारण, भूजल पातळी सुधारणा आणि कृषी विकासाला चालना मिळेल. शासनाच्या प्रत्येक निर्णयात शेतकऱ्यांचा विचार केंद्रस्थानी ठेवून कार्य केले जाईल.”

टाईम्स स्पेशल

राज्यमंत्री कदम यांनी पुढे सांगितले की, “शिवतर-कोडबा धरणासारखे आणखी सिंचन प्रकल्प उभारण्याचा आमचा निर्धार आहे. येत्या काळात तालुक्यात अशा आठ महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम सुरू होणार असून त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. या योजनांमुळे केवळ शेतीपुरतेच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि जलसंपन्नतेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला जाईल. शासनाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाण्याचा थेंब पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg