loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्जतमध्ये पिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात एक ठार तर पाच जखमी

कर्जत (जयेश जाधव) - कर्जत शहरातील दहिवली परिसरात एका पिसाळलेल्या बैलाने धुमाकूळ घातल्याने बैलाने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 22 ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते 23 ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत या बैलाने अनेकांवर हल्ले केले या हल्ल्यात दहिवली ललाणी रोड परिसरातील ९वर्षीय आदित्य कनोजे या मुलावर बैलाने हल्ला करून त्याला जखमी केले होते त्यानंतर 23 ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास 65 वर्षीय मंजुळा चव्हाण आणि योगिता थोरवे या मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले असता दहिवली मातोश्री हॉस्पिटल येथे बैलाने त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पनवेल येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे दरम्यान दहिवली संजय नगर येथील सत्तर वर्षीय अर्जुन म्हसे यांच्यावर सुद्धा बैलाने हल्ला करून गंभीर दुखापत केली त्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्या हल्ल्यात आणखी तीन ते चार जणांना या पिसाळलेल्या बैलाने जखमी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक संकेत भासे यांनी तात्काळ आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या फिरता दवाखान्याची टीम मदतीसाठी रवाना केली. ॲम्बुलन्स वरील राजन राठोड या युवकांने जखमींना तात्काळ उपचारासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तसेच संकेत भासे यांनी जखमींची कर्जत उपजिल्हा रुग्णाला येथे भेट घेऊन विचारपूस केली यावेळी राजेश लाड शरद लाड तसेच नागरिक देखील उपस्थित होते घटनेची माहिती मिळतात कर्जत पोलीस आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली खोपोली येथील गुरुनाथ साठेलकर यांच्या हेल्थ फाउंडेशन ने तात्काळ कर्जत मध्ये दाखल होत पिसाळलेल्या बैलाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले यानंतर अत्यंत साहसी प्रयत्नाने बैलाला पकडून बांधून ठेवण्यात गुरुनाथ साठेलकर व त्यांच्या टीमला यश आले या साऱ्या थरारक घटने दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती यावेळी दहिवली येथील राज्य मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता तर नागरिकांची गर्दी वाढत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg