loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या शार्दूल रेवडेकरची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मालवण (प्रतिनिधी) - कट्टा येथील वराडकर इंग्लिश मीडियम व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शार्दुल रेवडेकर यांने जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या १९ वर्षे मुले खालील वयोगटात ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला असून त्याची रत्नागिरी डेरवण येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शार्दूल रेवडेकर याला प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख संदीप गोळवणकर यांचे तसेच प्रशिक्षक मारुती सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शार्दूल याचे प्रशालेचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस एस पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिका यांनी अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg