loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी, खेड शहर कार्यालयात दिवाळी उत्साहात साजरी

खेड (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी, खेड शहर कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला आणि एकमेकांना शुभेच्छा देत ऐक्याचा संदेश दिला. शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत संघटनेच्या बळकटीसाठी सर्वांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली. शहराध्यक्ष कानडे यांनी आपल्या मनोगतात भाजपचे जुने दिवस, कार्यकर्त्यांचे योगदान आणि पक्षाच्या उभारणीतील संघर्षपूर्ण काळ यांची आठवण करून दिली. त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करताना दादा धामणकर आणि रमेश भागवत यांचे कार्य आदरपूर्वक स्मरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आबा जोशी यांनीही आपल्या भाषणात पक्षाच्या सुरुवातीच्या काळातील कामकाज, कार्यकर्त्यांचा समर्पित दृष्टिकोन आणि संघटनात्मक बांधणी याबाबतचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. त्यांनी सांगितले की, जुन्या कार्यकर्त्यांच्या त्यागातून आणि मेहनतीतून आज पक्ष इतका बळकट झाला आहे. या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिकेवर फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg