loader
Breaking News
Breaking News
Foto

भाई जगताप यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत राजकीय खळबळ

मुंबई: मुंबईत महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुंबई माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी केलेल्या वक्तव्याने आघाडीमध्ये खळबळ माजली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. आम्ही ना उद्धव ठाकरे यांच्यासोबत, ना राज ठाकरे यांच्यासोबत जाणार अशी भूमिका भाई जगताप यांनी मांडली आहे.जगताप यांच्या या वक्तव्याने काँग्रेसने मविआच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आतापर्यंतच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाते.

टाइम्स स्पेशल

2017 मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट लढत झाली होती. यावेळी मविआ एकत्र राहणार की प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीवर जाणार, यावर सध्या सगळ्यांचे लक्ष आहे.आघाडीतील नेते आधीच जागावाटपाच्या चर्चेमुळे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच भाई जगताप यांचं हे वक्तव्य आघाडीतील अंतर्गत मतभेद अधिकच वाढताना दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg