loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड जेसीआयच्या अध्यक्षपदी अमित नामुष्टे तर सचिव पदी मधुर पेठे यांची निवड

खेड (प्रतिनिधी) - खेड जेसीआयच्या अध्यक्षपदी अमित नामुष्टे तर सचिव पदी मधुर पेठे यांची निवड करण्यात आली आहे. जेसीआय खेडच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. यावेळी मावळत्या अध्यक्ष अमर दळवी यांनी त्यांच्या संपूर्ण वर्षाचा अहवाल सर्वसाधारण सभेत मांडला त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी संकेत अपिष्टे यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार सन 2026 करिता अध्यक्ष म्हणून अमित नामुष्टे तर सचिव पदावर मधुर पेठे यांनी नामनिर्देशन भरली असल्याची माहिती सभागृहाला दिली. अन्य कोणीही नामनिर्देशन फॉर्म न भरल्यामुळे या दोघांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. पदग्रहण समारंभ डिसेंबर महिन्यात होणार आहे. या सभेला माजी अध्यक्ष शैलेश मेहता, गोविंद राठोड, रवी उदय जाधव, आनंद कोळेकर, पराग पाटणे, प्रमोद कांबळे, जावेद कौचाली, गणेश राऊत, प्रियेश तलाठी, मिलिंद इवलेकर, अमोल क्षीरसागर, अमित कदम तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. नूतन अध्यक्ष अमित नामुष्टे, सचिव मधुर पेठे यांची निवड झाल्यानंतर त्यांना निवड झाल्याचे पत्र अध्यक्ष अमर दळवी व निवडणूक निर्णय अधिकारी संकेत अपिष्टे यांच्या हस्ते देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg