loader
Breaking News
Breaking News
Foto

महिला वैद्यकीय अधिकारी मृत्यू प्रकरणी निषेधार्थ वैद्यकीय अधिकारी वर्ग अ चे काळे फीत लावून आंदोलन

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांचा दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेला मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक आणि संतापजनक आहे.या घटनेत संबंधित नराधमांवर योग्य कलमानुसार गुन्हा दाखल होऊन कठोर शिक्षा होईपर्यंत, महाराष्ट्र राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी आजपासून काळ्या फीत लावून कामकाज करतील.आवश्यकतेनुसार पुढील काळात कामबंद आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी (गट अ) संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी आजपासून काळ्या फीत लावून कार्यरत राहतील. सर्वांनी या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी विनंती डॉ. सतोंष य. यादव अध्यक्ष,रत्नागिरी जिल्हा मॅग्मो संघटना यांनी केली आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg