loader
Breaking News
Breaking News
Foto

रोणापालमध्ये मांगरावर विजेचा खांब कोसळून नुकसान

बांदा : (प्रतिनिधी) - रोणापाल-देऊळवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे विजेचा खांब कोसळून तो थेट मांगरावर पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत मांगराच्या छपराचे मोठे नुकसान झाले असून त्यामध्ये ठेवलेले भातपीक पूर्णपणे भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु विजेच्या खांबामुळे रस्त्यावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या घटनेबाबत माजी सरपंच उदय देऊलकर यांनी ठेकेदार आणि महावितरण अधिकार्‍यांवर दुर्लक्षाचा आरोप केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी सांगितले की, ठेकेदाराने दर्जाहीन काम केल्याने आणि महावितरणच्या अधिकार्‍यांनी योग्य तपासणी न केल्याने ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसात खांब कोसळून मांगरावर पडल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी संतप्त होत बांदा सहाय्यक अभियंता रघुनाथ ठाकूर यांना स्पष्टीकरण मागितले. तपासात समोर आले की विजेचा खांब योग्य पद्धतीने जमिनीत पुरलेला नव्हता. त्यामुळे तो पावसात कोसळला. याबाबत माजी सरपंच सुरेश गावडे यांनीही ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला आहे. लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg