loader
Breaking News
Breaking News
Foto

थिबाराजाकालीन बुध्दविहार संघर्ष समितीचा धडक मोर्चा, बौध्द समाजाची तुडुंब गर्दी

रत्नागिरी - रत्नागिरी येथे डीएसपी बंगला जवळ थिबाराजाकालीन बुध्दविहारासाठी महाराष्ट्र शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाने आरक्षित करुन जिल्हाधिकारी यांच्याकडे साडे सतरा गुंठे जमीन हस्तांतरीत केली,सदर जागा बौध्द समाजाच्या ताब्यात घेण्यासाठी एक ट्रस्ट तयार करण्यात आली पण दुर्दव ट्रस्ट मधील पदाधिकारींनी रत्नागिरी नगरपरिषदेला पत्र देउन रत्नागिरी नगरपरिषदेकडे वर्ग केली, आणि सदर जमिनीवर "बुध्दविहार न बांधता कम्युनिटी हाँल (समाजमंदिर)" चा प्रस्ताव नगरपरिषदेने तयार करून नगरोथ्थान विकास निधीतुन आठ कोटी रुपये मंजुर केले, समाजाला सागण्यात आले, शासन दरबारी कागदावर कम्युनिटी हाँल (समाजमंदिर) आणि बांधणार ,नाव देणार बुध्दविहार ही समाजाचीच नव्हे तर तथागत बुध्दांच्या विचारांचीच फसवणुक होतेय हे समाजातील सुज्ञ वर्गात लक्षात आले नंतर खरा संघर्ष उभा राहीला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

थिबाकालीन ट्रस्ट चे पदाधिकारी आजही राजकीय दबावापोटी कम्यनिटी हाँल (समाजमंदिर) साठी ठाम राहीले आहेत तर समाजातील सर्व धार्मिक, सामाजिक ,राजकीय संघटना कम्युनीटी हाँल च्या नावाने फसवणुक होतेय म्हणुन जागृत झाले समाजाला जागृत केले आणि "थिबाकालीन राजा बुधदविहार संघर्ष समिती" स्थापन केली, समाजात एक स्वाभिमानी आवाज बुलंद करण्यात आला आणि बौध्द समाजाची हक्काची जागा ताब्यात घेण्यासाठी सोमवार, २७आँक्टोबर २०२५ चा दिवस ठरला , तशी तयारीही झाली, संर्घ समिती चे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते संपुर्ण तालुक्यात झोकुन काम करत असताना मोर्चा साठी समाजातुन "तन-मन-धन" लावून मदतीसाठी समाजातील वर्ग सर्वतोपरी मदतीसाठी तयार झाला. मोर्चा ची बांधणी मजबुत होतेय , समाजातुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे हे राजकीय दबावाखाली काम करणारी कम्युनिटी हाँल ची मागणी करणारी ट्रस्ट ची मंडळींवर राजकीय दबाव आला मोर्चा अयशस्वी करण्यासाठी , मग ही मंडळी गावोगावी मोर्चा ला समाज येउ नये यासाठी फीरु लागली, काही धार्मिक संघटनांच्या जबाबदार पदाधिकारींनी मोर्चासाठी शाखांमधील लोकांनी जाउ नये यासाठी वर्तमानपत्र, सोशल मीडीयावर बातम्या दिल्या.

टाइम्स स्पेशल

पण समाजात झालेला उठाव हा कोणत्याही व्यक्तिविरोधात नव्हता तर समाजाची जागा नगपरिषद बळकावुन कम्युनिटी हाँल(समाजमंदिर)बांधत आहेत तर समाजाला आपली जागा बौध्द समाजाच्या ताब्यात घेउन "सदर जागेवर आपल्या हक्काचे बुध्दविहारच हवे" यासाठीचा उठाव होता त्यासाठी मोर्चा साठी विरोध करणारी मंडळी ,जबाबदार पदाधिकारी "सपशेल" "फेलच" ठरली ..आणि थिबाराजाकालीन बुध्दविहार संघर्ष समिती चा मोर्चा पूर्णपणे मोठ्या ताकदीनिशी यशस्वी झाला याच पुर्ण श्रेय हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते , गावागावातील स्वाभिमानी विचारांची मंडळी यांचे आहे, ही एकजूट आणि हा स्वाभिमानी हक्काच्या जागेचा संगर "तथागत गौतम बुध्द आणि डाँ. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरीत होउन कायमच सुरु राहील, आणि जागेसाठी चा विजय ही संपादन करेल, हा सुर मोर्चातुन दिसून आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg