मुंबई - मुंबई येथील आझाद मैदानात लाखोंच्या संख्येने कुणबी बांधव विशाल कुणबी एल्गार मोर्चात सहभागी झाल्याने सरकारचे धाबे दणाणले होते. कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे, सरचिटणीस कृष्णा वणे आदि सर्व पदाधिकारी, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, बळीराज सेनाप्रमुख अशोक वालम, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष प्रकाश शेंडगे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, कुणबी सेवा संघ अध्यक्ष रविकांत बावकर, उद्योजक वसंत उदेक, सहदेव बेटकर जि प उपाध्यक्ष संतोष थेराडे आदींच्या नेतृत्वाखाली हा विशाल एल्गार मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला सामोरे जाताना मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निवेदन स्वीकारताना आपण आठ दिवसांत कुणबी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्या करिता मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तब्बल तीन आठवडे होऊनही बैठकीचा पत्ता नाही. हा कुणबी बांधवांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.
कुणबी समाजाची प्रमुख मागणी कुणबी नावाने ओबीसी मधील मराठ्यांची घुसखोरी थांबवण्यासाठी २सप्टेंबर २०२५ चा शासननिर्णय रद्द करण्यात यावा.ही असल्याने व ती मान्य न केल्यास कुणबी समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावं लागेल आणि ते सरकारला परवडण्यातले नसल्यानेच मुख्यंमंत्र्यांसमवेत होणारी बैठक चालढकल करण्यात येत आहे. या बाबतीत सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्या बाबत विचार विनिमय करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ, जिजाऊ संघटना, बळीराज सेना, कुणबी सेवा संघ, कुणबी सेना आदी सर्व कुणबी सामाजिक संघटनांची मीटिंग रविवार २६/१०/२५ रोजी अकरा वाजता विद्यार्थी वसतिगृह, प्रबोधन हॉल, आंबेडकर नगर, मुलुंड येथे लावण्यात आली आहे. या मीटिंगमध्येच सरकार विरोधी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. कुणबी समाजोन्नती संघाने कुणबी समाजातील महिलांची बदनामी करणाऱ्या ढवळे प्रकाशन याचा निषेध करण्यासाठी सन २००२ ला असाच विराट मोर्चा काढला होता त्यानंतर आता हा ओबीसी आरक्षण बचावासाठी लाखोंचा एल्गार मोर्चा तब्बल २२ वर्षानंतर काढण्यात आला झाला.
"मडे झाकोनी करती पेरण्या ऐशी कुणबी यांची जात". घरात मयत झालं आणि जर पाऊस आला तर प्रथम पेरण्या करून नंतरच हा घरातील मयत व्यक्तीचं अंत्यविधी करणारी ही कुणबी जात असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. मात्र गेले पाच महिने सततच्या पावसाने हैराण झालेला कुणबी शेतात धान्य तयार झाले, कडक ऊन पडलं तरीही शेतातील तयार धान भात कापायचं सोडून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यातील कुणबी बांधव मोठ्या संख्येने या एल्गार मोर्चाला उपस्थित राहिले हे खूपच कौतुकास्पद आहे. एकाच एल्गार मोर्चा ने मुंबईसह कोकणातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून जर या समाजाने ठरवलं तर सारेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील उमेदवार कुणबी समाजाचे निवडून येऊ शकतात एवढी मतदार जनशक्ती या समाजात आहे पूर्वी सुमारे ३० वर्षांपूर्वी लोकनेते शामरावजी पेजे यांच्या कारकीर्दीत या रत्नागिरी जिल्ह्यात बारा आमदार कुणबी समाजाचे असायचे हा या समाजाचा उज्वल इतिहास आहे. त्यामुळे सरकारने जर कुणब्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास हा समाज सत्तास्थाने हस्तगत करू शकतो अशी या समाजात धमक आहे.












































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.