loader
Breaking News
Breaking News
Foto

तुर्भे येथील गरीब महिलांना गृहोपयोगी साहित्य वाटप

खेड : तालुक्यातील सुपुत्र आणि संकल्प सामाजिक स्वंयसेवी संस्थेच्यावतीने दीपावलीनिमित्त सेक्टर नंबर २१, तुर्भे, नवी मुंबई येथील गरीब महिलांना ३०० गरीब व गरजु महिलांना दोन किलो रखा, दोन किलो मैदा, एक किलो साखर, एक किलो डालडा आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सीए नवी मुंबईचे श्री एम. ए. शेट्टी, डॉ. राजेश आतुरकर, ( आर.एम.ओ. नवी मुंबई महानगरपालिका, वाशी, यांचे हस्ते संयोजक अशोक सकपाळ यांचे उपस्थितीत करण्यात आले. दीपावलीनिमित्त गेली २९ वर्ष हे वाटपाचे काम गरजु आणि गरीब महिलांना करून त्यांना आनंदात दीपावलीचा सण साजरा करण्यात संस्था सिंहाचा वाटा उचलत आहे. या वाटपामुळे महिला संकल्प सामाजिक सेवाभावी संस्थेला धन्यवाद देत आहेत. तर हा वाटपाचा कार्यक्रम सामाजिक बांधिलकीतून समाजोपयोगी असा राबविण्याचे काम संस्था अखंडपणे करुन सामाजिक चळवळ सुरु ठेवत आहे. हा वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश सकपाळ, शांताराम धनावडे, दत्ता देसाई, भानुदास गायकवाड, संतोष कांबळे, अनिल सकपाळ, कैलास सकपाळ, कार्तिक आंबवले, सुरेश जाधव, सतीश मस्तुद, योगेश सकपाळ आदींनी परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg