loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर ऐतिहासिक पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात

मालवण :(प्रफुल्ल देसाई ):ढोल ताशांचा गजर आणि श्री देव रामेश्वर - नारायणाचा जयघोष करत आज मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण आणि रामेश्वर यांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्याला दुपारी १ वाजल्यापासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण पालखीत विराजमान होऊन आपल्या लवाजम्यासह आणि प्रजाजनांसह मालवण परिक्रमणेसाठी निघाले असून यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देऊळवाडा येथून या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. देऊळवाडा येथील श्री देव रामेश्वर मंदिरातून पालखीला सुरुवात होऊन रामेश्वर व नारायणाचे वर्सलदार कुटूंबीय आणि गावकर मानकऱ्यांना रामेश्वरासमोर श्रीफळ ठेऊन गाऱ्हाणे घातले. ढोल -ताश्यांच्या गजरात रामेश्वर व नारायणाची पालखी मालवणच्या परिक्रमणेसाठी बाहेर पडली. श्री देव नारायण, श्रीदेवी पावणाई, श्रीदेवी भावई, श्रीदेवी सातेरी या सर्व देवतांना सांगणे करून पालखी मार्गस्थ झाली. पालखी देऊळवाडा येथून आडवण मार्गे वायरी तानाजी नाका येथे आली असता पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर वायरी येथील श्री देव भूतनाथ मंदिरात बहीण भूतनाथची भेट घेऊन काही काळ विश्रांती करत पालखी समुद्रकिनाऱ्याकडे मार्गस्थ झाली आहे. त्यानंतर मोरेश्वर, दांडेश्वर, मक्रेबाग, काळबादेवी व जोशीमांड येथे भेटी देऊन पालखी रात्री मालवण बाजारपेठेत रामेश्वर मांड येथे दर्शनासाठी थांबणार आहे. त्यानंतर रात्री उशिरा पालखी पुन्हा देऊळवाड्यात मार्गस्थ होणार आहे.

टाइम्स स्पेशल

रामेश्वर- नारायण पालखीचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. यासाठी पालखी मार्गावर रांगोळ्या काढून पताका लावण्यात आल्या आहेत. पावसाचे सावट असले तरी मोठ्या उत्साहात पालखी सोहळा संपन्न होत असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg