loader
Breaking News
Breaking News
Foto

थिबा कालीन बुद्धविहारासाठी 27 ऑक्टोबरला मोर्चा

रत्नागिरी (प्रतिनिधी) - थिबा कालीन बुध्द विहारासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेत प्रशासनाच्या वतीने होऊ घातलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम प्रक्रिया रद्द कराव़ी तसेच थिबा राजा कालीन बुध्द विहाराची राखीव आरक्षीत ठेवलेली नोंद पुर्ववत करुन ती जागा बौध्द समाजाला मिळावी या मागणीसाठी बौद्ध समाजाकडून रत्नागिरीत 27 ऑक्टोबरला मोर्चा चे आयोजन करण्यात आले आह़े अशी माहिती थिबा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष एल़ व्ह़ी पवार व कार्याध्यक्ष अनंत सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिल़ी ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी मोर्चाविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी कार्याध्यक्ष सावंत यांनी सांगितले की, 27 ऑक्टोबर रोजी मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता थिबा कालीन बुद्धविहार येथे होईल़ यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येईल़ मोर्चामध्ये सुमारे 5 हजार बौद्ध समाजबांधव उपस्थित राहणार आह़े मोर्चाविषयी लोकांमध्ये उत्साह असून गावोगावी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सावंत यांनी सांगितल़े.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंत यांनी यावेळी सांगितले की, थिबाराजा कालीन बुध्दविहार इंग्रज सरकारने थिबाराजा यांच्यासाठी त्यांचे इच्छेनुसार बांधून दिले होते. त्यावेळेपासून रत्नागिरी ही बौध्द संस्कृतीने पवित्र झालेली भुमी आहे. त्याची देखभाल बौध्द बांधव नियमीतपणे करत आहे. विहाराची अधिक चांगली देखभाल करण्यासाठी व ती जागा मिळवण्यासाठी गेली अनेक वर्षे बौध्द बांधवांनी प्रयत्न केल्यानंतर थिबा राजा कालीन बुध्द विहार व त्याखालील जागा एकूण क्षेत्र 17.50 गुंठे प्रशासकिय मोजणी करून सन 2014 मध्येच बौध्द बांधवांसाठी राखून ठेवल़ी बुध्द विहाराची जागा ही एका विशिष्ठ कारणासाठी राखीव असून त्या जागेत बुध्द विहार अस्तित्वात आह़े याची पूर्ण जाणीव असतानाही त्या जागेत कम्युनिटी सेंटर बांधण्यात येत आह़े थिबा राजा कालीन बुध्द विहाराची जागा शासनाच्या आदेशानुसार फक्त बुध्द विहारासाठी राखीव ठेवण्यात आलेली असताना त्या धर्मस्थळाचा अवमान करत त्या जागेचा वापर इतर हेतूसाठी केला जात आह़े अशा प्रकारे आरक्षित क्षेत्रामध्ये कम्युनिटी सेंटर बांधण्यास दिलेली परवानगी म्हणजेच बौध्द समाजावर केलेला अन्याय आहे. आरक्षित जागेत होवू घातलेले कम्युनिटी सेंटर हेच बुध्दविहार आहे असे संबोधून बौध्द समाजाची प्रशासनाकडून फसवणूक केली जात आहे. कम्युनिटी सेंटरसाठी बौध्द समाजाचा विरोध नाही मात्र ते या ऐतिहासीक व विशिष्ठ कारणासाठी राखून ठेवलेल्या व ऐतिहासीक बुध्द विहारासाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये नको. त्यामुळे प्रशासनाच्या या समाज विरोधी धोरणामुळे समाजात असंतोष निर्माण झाला आहे. लोकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहचाव्यात यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितल़े पत्रकार परिषदेला थिबा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष किशोर पवार, प्रकाश पवार, सल्लागार सुनील आंबुलकर, दीपक जाधव, सहसचिव रुपेश कांबळे, प्रसिद्धी प्रमुख केतन पवार आदी उपस्थित होत़े.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg