loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलादपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार

पोलादपूर (धनराज गोपाळ) - पोलादपूर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकेकाळी पोलादपूर माजी पंचायत उपसभापती म्हणून कार्यरत असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे शैलेश सलागरे यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाम. भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन प्रवेशकर्ते माजी उपसभापती शैलेश विठोबा सलागरे यांच्या समवेत कापडे बु. प्राजक्ता शैलेश सलागरे, ओमकार शैलेश सलागरे ,मालती विठ्ठल सलागरे, नरेश विठ्ठल सलागरे, अमृता नरेश सलागरे , व शिवराम सावंत, अनिता अनंत सावंत, देवजी रामचंद्र शेलार, सविता देवजी शेलार, अश्विनी देवजी शेलार, रेश्मा देवजी शेलार, शुभम देवजी शेलार, रेखा देवजी शेलार, नामदेव हिरू मोरे , अंजना नामदेव मोरे ,संतोष नामदेव मोरे, अश्विनी संतोष मोरे , विवेकान नामदेव मोरे ,पुनम विवेकान मोरे, नितीन नामदेव मोरे, प्रियंका नितीन मोरे, रोहित नामदेव मोरे, वैभव कृष्णा कुंभार, सविता कृष्णा कुंभार, पांडुरंग सपकाळ, आनंद शिंदे, कविता शिंदे, राजाराम सपकाळ, सुनिता सपकाळ, भगवान सपकाळ, हिना सपकाळ, विठ्ठल पार्टे, मंगेश धर्माधिकारी ,सुवर्ण धर्माधिकारी, बबन धर्माधिकारी, अनुसया धर्माधिकारी, प्रसाद गायकवाड ,रवींद्र गायकवाड, राहुल जंगम, सचिन गायकवाड ,प्रवीण वनारसे, ललिता बामणे ,कल्याणी बामणे ,संचित बामणे, चंद्रकांत सपकाळ, मुस्तफा दिवेकर, अमीर पवार, सविता पवार, रुपेश मेहता, रूपा मेहता, आबा पवार ,अनिल पवार ,सतीश पवार, तेजस पवार , चांभारगणी विठोबा नामदेव येरापले, दिनेश विठोबा येरापले, प्रथमेश येरापले, विष्णु शिंदे, विमल शिंदे, विकी शिंदे, दर्शना येरापले, दीपिका येरापले, रुक्मिणी येरापले, पायल येरापले, प्रियंका येरापले, लक्ष्मी शिंदे, रोहित शिंदे, पायटा गावातील मधुकर निकम प्रकाश निकम कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीररित्या प्रवेश केला.

टाइम्स स्पेशल

या पक्षप्रवेश सोहळ्याला नामदार भरतशेठ गोगावले यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, नगरसेवक सिध्देश भरत चोरगे स्वप्निल चोरगे तसेच उपतालुका प्रमुख अंकुश सकपाळ, विभाग प्रमुख तानाजी निकम, उपविभाग प्रमुख पांडुरंग वरे, लक्ष्मण साने, दत्ताराम तळेकर, शांताराम गोळे, काशिनाथ कुंभार युवासेना तालुका प्रमुख संजय कळंबे, तसेच ग्रामपंचायत सरपंच आदिती अनिल मोरे, उपसरपंच जितेंद्र सकपाळ, सदस्य नितेश चव्हाण, अशोक मोरे, निलम धुमाळ, शाखाप्रमुख लक्ष्मण बुवा चव्हाण, संदेश सकपाळ, राजेंद्र सकपाळ, नारायण साने यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. या प्रवेशामुळे पोलादपूर तालुक्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सलागरे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठी ताकद मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. . नामदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आणि शिवसेनेच्या विचारधारेतून जनतेची सेवा करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मी कटिबद्ध राहणार असल्याचे शैलेश सलागरे यांनी सांगितले . दरम्यान शैलेश सलागरे यांना कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली पोलादपूर तालुक्यात शिवसेनेचा झेंडा अधिक उंचावेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

माजी उपसभापती शैलेश सलागरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश !

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg