loader
Breaking News
Breaking News
Foto

तर... दीपावलीनंतर कार्यालयात फटाके फोडणार!

खेड (प्रतिनिधी):- खेड-भरणे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असतानाच धुळीच्या त्रासानेही वाहनचालकांसह पादचारी व दुकान व्यावसायिक अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. या प्रश्नी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आक्रमक झाले असून येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. या मार्गावर दररोज पाणी मारून धुळीच्या त्रासापासून दिलासा न दिल्यास दीपावलीनंतर कार्यालयात फटाके फोडू अशी तंबी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली. खेड-भरणे मार्ग पुरता खड्यात गेला आहे. राज्य मार्गाचा दर्जा प्राप्त झाला असतानाही मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाहनचालकांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्यांमुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले असून दुरुस्तीसाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यात धुळीच्या साम्राज्याचीही नवी भर पडली आहे. धुळीमुळे वाहनचालकांसह पादचारी हैराण झाले आहेत. दुकानदारांवरही दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजारही वाढत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत. ऐन दीपावली सणातही खड्डे अन् धुळीची समस्या कायम असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. खेड-भरणे मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी पुढाकार न घेतल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा दम भरला आहे.

टाइम्स स्पेशल

या मार्गावर दररोज टँकरने पाणी मारुन मार्ग सुस्थितीत ठेवण्यासाठी लक्ष न घातल्यास दीपावलीनंतर कार्यालयात फटाके फोडून निषेध नोंदवू असा सज्जड इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर मार्ग सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करते, याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे. माजी नागराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी व्यापारी व प्रवासी वर्ग साठी आवाज उठवताच सर्वत्र अभिनंदना चा वर्षाव होत आहे. कारण या धुलीला व्यापारी व प्रवाशी खूप कंटाळले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg