loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची विधानसभा क्षेत्रस्तरीय पहिली बैठक खेड येथे संपन्न

खेड (दिलीप देवळेकर) - मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना समितीची पहिली बैठक नुकतीच खेड येथील उपविभागीय कार्यालयात समीतीचे अध्यक्ष किशोरभाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपविभागीय अधिकारी सौ.वैशालीताई पाटील, तहसीलदार सुधीर सोनावणे, शैलेश सणस डीवायएसपी, दयाळ जिल्हापरिषद गटाचे सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी योजनेचा उद्देश, निकष या योजनेंतर्गत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या ४० अर्जावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांना आपल्या शेतजमिनी पर्यंत सुलभतेने यंत्रसामुग्री नेता यावी, तयार शेतमाल वाहतुक करण्यासाठी सुलभता यावी यासाठीच सरकारकडून बळीराजा पाणंद रस्ते योजना आणली गेली असून या माध्यमातून शेतकर्‍यांनी, ग्रामस्थांनी सुचवलेल्या रस्त्यावर अडचणी असतील तर त्या त्वरित दूर करुन शासनाच्या निकषानुसार रस्ता कागदावर आणून संबधीत सर्व खात्याच्या सामुहिक प्रयत्नातून आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून रस्ते तयार करून त्यावर आवश्यक निधी प्रस्तावित करुन सरकारची ही योजना यशस्वीपणे राबवण्याच आवाहन किशोरभाई देसाई यांनी बैठकी प्रसंगी व्यक्त केले. या बैठकीला भूमिअभिलेख, पंचायत समीती, जिल्हापरिषद बांधकाम, कृषी आदी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg