loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपाच्या स्वरुप महाजन यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

दापोली (प्रतिनिधी) : नाम.योगेश कदम यांच्या माध्यमातून होत असलेल्या गावागावातील विकास कामांच्या पूर्ततेच्या प्रभावाने प्रेरित होत भाजप कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष स्वरुप महाजन यांनी नाम योगेश कदम यांच्या उपस्थितीत भाजपातून शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. महाजन यांच्या या पक्षप्रवेशामुळे जुईकर मोहल्ला पंचायत समिती गणासह केळशी जिल्हा परिषद गटात नाम.योगेश कदम यांची पर्यायाने शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, शिवसेना दापोली विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, नगराध्यक्ष कृपा घाग, उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, हातीप शिवसेना शाखाप्रमुख आणि माजी सरपंच महादेव शेडगे, युवासेना शहर अधिकारी स्वप्निल पारकर, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नदीम मुकादम, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर, माजी नगराध्यक्षा रसिका पेठकर, नगरसेविका प्रीती शिर्के, विश्वास कदम, शिवसेना महिला आघाडी तालुका संघटिका दिप्ती निखार्गे, सुयोग घाग आदी मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg