loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - राज्य घटनेमध्ये अधोरेखीत केलेला न्याय तळागाळा पर्यंत पोहचवायचा असेल तर सामान्य माणसाच्या जीवनाचा स्तर उंचावणा-या कल्याणकारी योजना आखणे आणि त्यांची प्रभावीरीत्या अंमल बजावणी करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. कल्याणकारी योजना आखल्या जातात परंतु त्यांची माहीती सामान्य माणसापर्यंत पोहचत नाही. यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी आणि सरकारचे इतर अधिकारी, पोलीस अधिकारी हे सर्वजण कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे काम करत असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी लांजा येथे केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद रत्नागिरी तालुका वकील संघ लांजा यांचे संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा लांजा येथे श्रीमती कुसुमताई वंजारे महाविद्यालयातील प्रांगणात संपन्न झाला. यावेळी न्यायमूर्ती जामदार बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमुर्ती रत्नागिरी जिल्हा माधव जामदार, प्रमुख जिल्हा रत्नागिरी व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष विधीसेवा प्राधिकरण रत्नागिरी विनोद जाधव, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, मुख्याधिकारी जिल्हापरिषद रत्नागिरी वैदही रानडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आर.आर.पाटील, रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष विश्वास पाटील, लांजा बार असोसिएशन अध्यक्ष ऍड.सदानंद गांगण आदी मान्यवर व्यासपीठावर होते तसेच न्यायाधीश, वकील, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरूवातीलाच जिल्हा विधीसेवेचे काम दाखवणारे पथनाट्य सादर करण्यात आले. महामेळाव्यात न्यायमूर्ती जामदार यांनी विविध योजनांच्या स्टॉलची पाहणी करून माहिती जाणून घेतली. तसेच लाभार्थींना धनादेश व इतर वस्तूचे वाटप करण्यात आले तसेच सर्व योजनांची एकत्रित मार्गदर्शक माहितीची पुस्तिका न्यायमूर्ती यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg