loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंढर (शिरबारवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील मुंढर (शिरबारवाडी) येथे श्री विठ्ठल रखुमाई कमिटी व शिरबारवाडी ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांच्यावतीने श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विविध कार्यक्रमानी ह.भ.प. प्रकाश महाराज सोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झाला. सकाळी काकड आरती, पारायण संध्या. हरिपाठ, रात्री कीर्तनानंतर महाप्रसाद तसेच या अखंड हरिनाम सप्ताहमध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली. यामध्ये ह.भ.प. प्रज्ञा ताम्हणकर - शिरगाव, ह.भ.प.रीयामाई भुवड - वडद, ह.भ.प. सचिन महाराज साळवी - पेवे खरेकोंड, ह. भ. प. प्रवीण महाराज मुळे, ह.भ.प.संतदास प्रकाश सोलकर चिखली, ह.भ.प. नारायण महाराज पवार अनारी, ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत डोंबिवली, तसेच बुधवारी काल्याचे किर्तन -ह.भ.प. प्रकाश महाराज सोलकर किर्तनसाथ करणारे कलाकार सर्वस्वी ह.भ.प. चंद्रकांत कदम, निलेश पारदळे, रमेश बारगोडे, कमलाकर वणगे, सचिन कळंबाटे, अमोल वणगे, संतोष भुवड, विनेश (बाबू) शिरकर चोपदार : तुकाराम सोलकर, विणेकरी: विश्राम चाळके सहभागी होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने ग्रामदेवतेच्या पालखीचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. ग्रामदेवतेच्या पालखीचे सर्व ग्रामस्थ व महिला यांनी पूजन केले. या कार्यक्रमादरम्यान मुंढर गावचे रहिवासी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांचा मुंढर गाव, श्री विठ्ठल रखुमाई कमिटी शिरबारवाडी ग्रामस्थ व वारकरी सांप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत डोंबिवली यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अखंड हरिनाम सप्ताहासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वच भाविकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल रखुमाई कमिटी व शिरबारवाडी ग्रामस्थ आणि महिला यांनी विशेष मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg