चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित ‘आराही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ या राज्यस्तरीय जनजागृती कार्यक्रमात चर्चासत्रात मानसोपचार तज्ञ डॉ. अतुल ढगे यांनी सायबर सुरक्षेच्या मानसिक पैलूंवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ. ढगे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, सायबर गुन्हे हे केवळ तांत्रिक नसून ते मानवी मानसशास्त्राचा फायदा घेऊन केले जातात. गुन्हेगार लोकांच्या लोभ, भीती आणि अतिउत्साह या भावनांचा वापर करून फसवणूक करतात. त्यामुळे सायबर सुरक्षिततेसाठी केवळ मजबूत पासवर्ड पुरेसा नसून मजबूत मानसिकता असणेही तितकेच आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अशा घटनांनंतर अनेक व्यक्तींमध्ये भीती, चिंता, असुरक्षितता आणि एकटेपणा वाढतो. काही प्रकरणांमध्ये हे पुढे जाऊन नैराश्य (depression) किंवा भीतीचे झटके (panic attacks) यांसारख्या मानसिक आजारांमध्ये परिवर्तित होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. “सायबर गुन्हे मोबाईलमध्ये सुरू होतात, पण त्याचा परिणाम मनावर होतो,” असे सांगत डॉ. ढगे यांनी मानसिक जागरूकता आणि भावनांवर नियंत्रण यावर भर दिला. “Prevention is better than cure” या तत्त्वावर आधारित राहून, लोकांनी सावध, सजग आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहणे हीच खरी सायबर सुरक्षिततेची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ कांचन मदार यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आराही सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ हा राज्यस्तरीय जनजागृती व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृती, महाराष्ट्र महिला डॉक्टर राज्यस्तरीय हेल्पलाईनचा शुभारंभ, ‘आराही नारी गौरव पुरस्कार’ प्रदान तसेच विशेष सांस्कृतिक सादरीकरण आणि ‘डिजिटल जागर’ जनजागृती कार्यक्रम पार पडले.

































































































































































































































.jpg)




.jpg)









































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.