loader
Breaking News
Breaking News
Foto

२२ मार्चला पनवेलमध्ये “अवघ्या आशा श्रीरामार्पण”

पनवेल - “श्री रामनवमी” निमित्त तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी, सांस्कृतिक सेल उत्तर रायगड यांच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “अवघ्या आशा श्रीरामार्पण” या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून गीत रामायण च्या माध्यमातून रामतत्त्वाची कालसुसंगत मांडणी सादर केली जाणार आहे. भक्ती, संस्कृती आणि सुरेल संगीताचा संगम असलेल्या या कार्यक्रमात प्रभावी कथन, भावपूर्ण गायन आणि दर्जेदार वाद्यसंगत यांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात स्नेहल दामले यांचे कथन, अभिजीत पंचभाई व श्रुती देवस्थळी यांचे गायन तसेच उद्धव कुंभार, अमित कुंटे आणि प्रसन्न बाम यांची वाद्यसंगत लाभणार आहे. हा कार्यक्रम रविवार, २२ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रवेश विनामूल्य असून पनवेल व रायगड परिसरातील नागरिकांनी कुटुंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय संध्याकाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अभिषेक पटवर्धन - ८६६८३३२१५९, वैभव बुवा- ९०२९४१०६९९, गणेश जगताप- ९८७०११६९४४ किंवा आदित्य उपाध्ये ८२९११९७५२६ यांच्याशी संपर्क साधावा.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg