वरवेली (गणेश किर्वे) - दापोली कृषी विद्यापीठाद्वारे अनुसूचित जाती उपयोजना अनुदान अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रशिक्षण व साहित्य वाटप कार्यक्रम घेतला जातो. अनुलोम या संस्थेच्या मदतीने गुहागर तालुक्यातील जानवळे येथे हा कार्यक्रम झाला. यामध्ये 39 लाभार्थ्यांना वैभव विळा व बांडगुळ कटरचे मोफत वाटप करण्यात आले. शेतीमध्ये यांत्रिकीकरण व्हावे यासाठी दापोली कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागातर्फे विविध अवजारे, यंत्रांचे संशोधन करण्यात येते. या आधुनिक यंत्रांच्या साह्याने शेती व्हावी यासाठी कृषी विद्यापीठामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. अशा योजनांपैकी अनुसूचित जाती उपयोजना अनुदान नावाची योजना आहे. या योजने अंतर्गत अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्रांची माहिती गावात जावून किंवा विद्यापीठात नेऊन दिली जाते. तसेच या शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसीत केलेली अवजारे उत्तेजनार्थ दिली जातात.
मात्र या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. अनुलोम या शासकीय योजनांवर काम करणाऱ्या संस्थेने धामणंद परिसरातील 50 शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दापोली कृषी विद्यापीठात नेले. त्यानंतर अनुलोमच्या मदतीने कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमाचे आयोजन जानवळे गावात करण्यात आले होते. दापोली कृषी विद्यापीठातील संशोधन विभागात काम करणारे व्ही. व्ही. आवारे यांनी गुंठ्यामध्ये होणाऱ्या भातशेतीमध्ये उपयुक्त लावणी यंत्र, कापणी विळा, नाचणीसाठीचे मळणी यंत्र, आदी यंत्रांची माहिती दिली. तळवळीतील प्रगतशील शेतकरी सखाराम पवार यांनी मुंबईकर ग्रामस्थांनी सणांमधील सुट्टी कमी करुन शेतीच्या दिवसात गावात येऊन शेती करण्याचे आवाहन केले. अनुलोमचे भाग जनसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी केवळ यंत्रांची माहिती घेऊ नका प्रत्यक्ष शेतात त्याचा वापर करा. खरेदीसाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यास अनुलोम साह्य करेल असे आवाहन केले.
यावेळी जानवळेच्या सरपंच वैभवी विखारे, उपसरपंच जानवळकर यांच्या हस्ते 39 लाभार्थ्यांना कृषी अवजारे भेट म्हणून देण्यात आली. यावेळी पोलीस पाटील मंगेश कोंडविलकर, समता नगर, एकता नगर मंडळांचे अध्यक्ष, अनुलोम मित्र संदिप कोंडकविलकर, मनसेचे विनोद जानवळकर, दापोली कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक निकम, समन्वयक कोळंबे आदी उपस्थित होते.
















































































































































































































.jpg)




.jpg)



























































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.