loader
Breaking News
Breaking News
Foto

खोपी-वेरळ फाटा रस्त्याची दूरावस्था, प्रवाशांचे हाल

खेड - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील खोपी ते वेरळ फाटा या १९ किलोमीटर रस्त्याची दरवर्षी दुरावस्था झाल्याची दिसते. या रस्त्याचा वापर वाहन चालकांसाठी कमी परंतु भ्रष्टाचारासाठी जास्त झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी ठराविक ठेकेदारच या रस्त्याचा ठेका घेतात, त्या ठेकेदारांवरती सार्वजनिक बांधकाम खात्याचा वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०२४ / २०२५ मध्ये या रस्त्यावरती रुपये १,८७,१९,७०५/- (एक कोटी सत्याऐंशी लाख एकोणीस हजार सातशे पाच) सन २०२५ / २०२६ रुपये ३३,०५,४४१/-( तेहतीस लाख पाच हजार चारशे एक्केचाळीस) म्हणजेच या रस्त्यावरती दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात परंतु रस्ता मात्र वाहतुकीसाठी नादुरुस्त असल्याचे दिसून येते. वाहनचालक या रस्त्याला वैतागून तिसंगी ऐनवली मार्गे भरणे या पर्यायी रस्त्याचा वापर सर्रासपणे करताना दिसून येतात. ठेकेदारांची घरे भरण्यासाठी या रस्त्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात केल्याचे त्रस्त प्रवासी वर्ग आणि वाहन चालकांतून सांगण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg