ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात दुचाकी चालविण्यासाठी लागणारा लर्निंग लायसन्स काढण्यासाठी एका एजंटने तरुणाकडून ५ हजार रुपये मागितल्याप्रकरणी एजंटला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. संशयीत कृष्णकुमार मिश्रा (४४) असे अटक केलेल्या एजंटचे नाव असून मिश्रा याने परवान्याच्या नावाखाली स्वत:साठी आणि आरटीओ अधिकाऱ्यांसाठी ५ हजार रुपये लागतील असे तरुणास सांगितले होते. तक्रारदार यांना दुचाकी चालविण्यासाठी शिकाऊ परवाना काढायचा होता. त्यामुळे त्यांनी १० मार्चला मिश्रा याला मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यावेळी त्याने स्वत:साठी आणि आरटीओ अधिकाऱ्यांसाठी असे एकूण ५ हजार रुपये लागतील असे सांगितले.
तक्रारदाराने त्याच्या मित्रांकडे याबाबत विचारणा केली असता, अवघ्या २०० रुपयांत परवाना काढून मिळतो अशी माहिती त्याला मिळाली. एजंटविरोधात कारवाई व्हावी यासाठी तरुणाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान ११ मार्चला पथकाने पडताळणी केली असता, मिश्रा याने तरुणाकडून पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ११ मार्चला मिश्रा याने ५ हजार रुपयांपैकी ७०० रुपये शासकीय शुल्क म्हणून तक्रारदार यांच्याकडून घेतले होते. तर उर्वरित ४ हजार ३०० रुपये दुसऱ्या दिवशी देण्यास सांगितले होते.
१२ मार्चला पथकाने सापळा रचून संशयीत मिश्रा याला ४ हजार ३०० रुपये घेताना कामगार रुग्णालय परिसरातील त्याच्या कार्यालयातून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात वागळे इस्टटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा पथकाकडून तपास पथकाकडून सुरु आहे

































































































































































































.jpg)




.jpg)


























































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.