loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची निवड

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जिल्हा परिषद गटातील जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान घेऊन निवडून आलेले चाफवली गावचे सुपुत्र विलास चाळके यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. विशेषता चाफवली गावासाठी अभिमानाची गोष्ट असल्याने उस्ताहाचे वातावरण आहे. दाभोळे जिल्हा परिषद गटातील विलास चाळके यांना उपाध्यक्ष पद मिळाले असल्याने या जिल्हा परिषद गटात उत्साहाचे वातावरण आहे. कारण यापूर्वी कधीही या जिल्हा परिषद गटाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वा उपाध्यक्ष पद मिळालेले नव्हते. या जिल्हा परिषद गटाच्या इतिहासात हे पद प्रथमच मिळाले असून सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विलास चाळके यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विलास चाळके यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद भूषवले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ सभापती पद भूषविलेले आहे. त्यांना शासकीय योजनांचा चांगला अभ्यास आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि सर्वच कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे या पदाला योग्य न्याय देतील अशी अपेक्षा सर्वच पक्षाकडून होत आहे. संघटना वाढीसाठी ते सतत प्रयत्न करत असतात, त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी विलास चाळके यांच्याकडे उपाध्यक्ष पद देऊन जबाबदारी दिली आहे. पालकमंत्री उदय सामंत व आमदार भैय्या सामंत यांचे दाभोळे जिल्हा परिषद गटातून आभार मानले जात आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg