loader
Breaking News
Breaking News
Foto

गॅस सिलेंडर पुरवठाबाबत युवासेनेच्यावतीने निवेदन

रत्नागिरी - रत्नागिरी युवासेनेच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांना गॅस सिलेंडर पुरवठाबाबत निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात, रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने गॅस सिलेंडरची टंचाई नसल्याचे घोषित केले असले तरी घरगुती व व्यावसायिकांना गॅसचा तुटवडा जाणवत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रत्येक तालुक्यातील दुकानांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या आहेत. काही ठिकाणी हॉटेल्स व साधी उपहारगृह बंद पडली आहेत. काही व्यावसायिकांनी चुली पेटवल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. अशा परिस्थितीत शालेय पोषण आहार, शिवभोजन, बेघर निवारा केंद्र, वसतिगृह तसेच अनाथ आश्रम मधील परिस्थिती आपण स्वतः लक्ष घालून हाताळावी. सर्व ठिकाणी तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधित एजन्सींना द्यावेत अशी मागणी निवदेनाव्दारे केली आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, युवासेना शहर प्रमुख आशिष चव्हाण, नाचणे विभाग समन्वयक रितेश लोखंडे, शिवसेना शाखाप्रमुख प्रसाद रायगंकर, ओमकार कारेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg