loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील 0 ते 18 वयोगटमधील मुलांचे संदर्भ सेवा शिबिर

खेड - राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा योजना अंतर्गत खेड तालुक्यातील 0 ते 18 वयोगट मधील मुलांचे संदर्भ सेवा शिबिर उपजिल्हा रुग्णालय कळंबनी येथे आयोजित केले गेले होते. एका शिबिरार्थी मुलीला डॉक्टर सगरे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन औपचारिक शुभारंभ करण्यात आला. सर्व वैद्यकीय चाचणीसाठी आलेल्या मुलांना रोटरी क्लब ऑफ लोटे तर्फे अल्पोपहार चहा बिस्किटे आणि इतर सेवा देण्यात आली. या प्रसंगी रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सग्रे तसेच इतर अधिकारी डॉक्टर विलास शेळके, डॉक्टर परेश मळनगावकर डॉक्टर मुजावर सहित भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर हॉस्पिटल डेरवणचे शल्यविशारद, इतर नर्सिंग स्टाफ आणि जनसंपर्क अधिकारी सचिन धुमाळ, प्राथमिक शिक्षक बेलोसे, तसेच चव्हाण हजर होते. या प्रसंगी डॉक्टर सगरे यांनी मुलांच्या काही गंभीर प्रकारच्या आरोग्य समस्या असतील तर त्या निरनिराल्या योजने अंतर्गत त्यांवर कायमस्वरूपी उपचार केले जातील त्यासाठी रोटरी क्लब ऑफ लोटे सारख्या सामाजिक संस्था ची मदत घेऊन आम्ही वर्षभर त्यावर काम करत राहू. त्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष उभारण्यात येईल, अशी माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डेरवण हॉस्पिटल चे जनसंपर्क अधिकारी सचिन धुमाळ यांनी शल्य चिकित्सा साठी हॉस्पिटल कडून कोणत्याही वैद्यकीय स्वरूपाची मदत करण्यात येईल अशी ग्वाही दिली. डॉक्टर विलास शेळके यांनी अजून व्यापक स्वरूपात सर्वेक्षण मोहीम सुरू करून शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक मुलापर्यंत आम्ही आमची टीम काम करेल असे सांगितले तर रोटरी क्लब ऑफ लोटे प्रेसिडेंट संदीप सुर्वे यांनी आज आम्ही फक्त नाश्ता आणि चहा बिस्कीट इथपर्यंत न थांबता शिबिरांतर्गत आणि उपरांत सुद्धा ही आरोग्य चळवळ प्रत्यक्ष सहभागाने पुढे नेऊ. रोटरी क्लबचे पोलिओ निर्मूलन मिशन जगभर यशस्वी ठरले असून आमच्या त्या अनुभवाचा फायदा करून घेऊन जनजागृती आणि प्रत्यक्ष काम करू असे आश्वासन दिले. उत्तमकुमार जैन यांनी या सर्व मुलांमध्ये काही विकलांग मुलाना स्वावलंबी बनवण्यासाठी यश स्नेहा ट्रस्ट घराडी यांच्या मदतीने वर्कशॉप मध्ये त्यांना सामावून घेऊ असे सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg