loader
Breaking News
Breaking News
Foto

रात्री आईचे निधन आणि सकाळी दिला दहावीचा शेवटचा पेपर

कणकवली (प्रतिनिधी) - दहावीच्या परिक्षेचा १८ मार्च रोजी शेवटचा पेपर परंतु परीक्षेच्या आदल्या दिवशी आईचे अचानक निधन झाले. आईच्या निधनाचा मोठा धक्का बसला असतानाचा अतिशय धैर्य आणि मनोबल दाखवत सई संतोष सावंत हिने दहावीच्या परिक्षेचा शेवटचा पेपर दिला. सईच्या या जिद्दीचे आणि शिक्षणाप्रती असलेल्या बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सई संतोष सावंत हिने अत्यंत कठीण आणि दुःखद प्रसंगातही दाखवलेल्या धाडसाने सर्वांनाच प्रेरणा दिली आहे. काल रात्री उशिरा सईची आई कै. साक्षी सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीत कोणतीही व्यक्ती खचून जाईल, मात्र सईने अतिशय धैर्य आणि मनोबल दाखवत दहावीच्या शेवटच्या पेपरला उपस्थित राहण्याचा निर्धार केला. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने सई परीक्षाकेंद्रावर वेळेत पोहोचली आणि तिने आपला पेपर पूर्ण केला. तिच्या या जिद्दीचे आणि शिक्षणाप्रती असलेल्या बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg