खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात रविवारी रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले असून रमजान ईद अगदी तोंडावर आलेली असताना कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. यावेळी भरणे नाका येथील गणेश शिरीषकर यांनीही पाण्याच्या टँकरसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला मदत केली. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र या आगीत घरातील मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
टाइम्स स्पेशल
इराणने केला मोठा हल्ला! UAE चे फुजैराह तेल टर्मिनल उडवले, कुवेत विमानतळावरही डागली क्षेपणास्त्रे

































































































































































































.jpg)




.jpg)


























































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.