loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सी कडे मागणी

पनवेल :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे पनवेल परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा होणारा काळाबाजार रोखण्याची विविध ठिकाणी जाऊन मागणी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अध्यक्ष अनिल देसाई यांच्या आदेशानुसार आखाती देशातील युद्धामुळे आपल्या विभागात इंधनाचा तुटवडा निर्माण होत असल्याने घरगुती गॅसची कमतरता ग्राहकांना भासत असल्याचे निदर्शनास येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर गोष्टीचा गैरफायदा घेत काही गॅस एजन्सी किंवा जे गॅस डिलिव्हरी देतात असे गॅस सिलिंडर चा काळाबाजार करण्याची दाट शक्यता आहे. तरी आपल्या एजन्सीकडून अश्या प्रकारे कुठलीही गोष्टी होणार नाही, याची दक्षता आपण घ्यावी व ग्राहकांना चालू दरातच सिलिंडर देऊन प्रामाणिक सेवा पुरवावी अशी मागणी आज शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे कक्ष जिल्हासंघटक शशिकांत डोंगरे, उपजिल्हासंघटक सुनित पाटील, कामोठे शहरसंघटक भरत शिंदे, कुणाल कुरघोडे, पळस्पे जिल्हा परिषद संघटक अनंता सांगडेकर, खांदा वसाहत उप शहर संघटक प्रसाद परब, उपशहर संघटक विजय कोलते आदींनी या संदर्भात पनवेल भारत गॅस सर्व्हिस - पनवेल, एच. पी. गॅस एजन्सी- नवीन पनवेल, श्री साईराम गॅस एजन्सी कळंबोली, आर .डी .एच .प. गॅस एजन्सी खांदा वसाहत, श्री साईराम भारत गॅस एजन्सी कामोठे, श्री साईराम गॅस एजन्सी खारघर आदी ठिकाणी संबंधित मालकांशी भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg