loader
Breaking News
Breaking News
Foto

बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशिराम यांची ९२वी जयंती

रत्नागिरी - बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे शिलेदार आणि वैचारिक वारसदार काशिराम ठरले. कारण त्यांनी संपूर्ण देशातील एससी -एसटी - ओबीसी- मायनॉरिटी समाजाला फुले- शाहु- आंबेडकर विचारधारेवर प्रशिक्षित करुन जागृत केले. संपूर्ण देशातील बहुजन समाजात राजकीय चेतना जागृत करुन ‘होऊ शकत आहे’ ची लहर तयार केली. सम्राट राजा अशोक यांच्या विचारांचा भारत तयार करण्यासाठी कंबर कसली आणि बहुजन समाजाला राजकीय ताकदीचे महत्व पटवून दिले, असे कांशिराम यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाप्रभारी सचिन मोहीते यांनी बोलताना सांगितले. बामसेफ, डीएसफोर, बुध्दिस्ट रिसर्च सेंटर, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशिराम यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त महाबोधी बुध्दविहार अशोकनगर परटवणे, रत्नागिरी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बामसेफचे संजय आयरे यांनी काशिराम यांच्या कार्याचे प्रेरणादायी दाखले देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला बसपा शहर अध्यक्ष रुपेश कांबळे, माजी विधानसभा अध्यक्ष राजू जाधव, माजी विधानसभा महासचिव किशोर पवार, अनंत पवार, भरत पवार, सौरभ आयरे, सौ. साची पवार, बामसेफ, बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg